गणेशाेत्सवात संकट पडले;  7620006402 या नंबरवर फाेन करा!

editor 1 Min Read
1 Min Read

राज्यातील ग्रामीण भागात नंदुरबार पोलीस दलाचा पहिला उपक्रम

नंदूरबार (आफताब खान) – गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. तसेच गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना विशेषता महिला भाविकांना सुरक्षित वातावरणात गणरायाचे दर्शन घेता यावे, यासह गणेश मंडळांना येणाऱ्या विविध समस्यांना लगेच प्रतिसाद देण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने हेल्पलाइन नंबर देण्यात आलेला आहे.

7620006402 हेल्पलाइन नंबर वर भक्तांकडून किंवा गणेश मंडळाकडून मदत मागण्यात आल्यास त्यांना तात्काळ प्रतिसाद देण्यात येत असतो. यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस मुख्यालयात एक विशेष कक्ष उभारण्यात आला असून या कक्षा 24 तास पोलीस कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहे.  हेल्पलाइन नंबर वर फोन आल्यानंतर संबंधिताला लगेचच पोलीस मदत मिळते किंवा त्याचा समस्येचे लगेच निराकरण केले जात असल्याने नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने सण उत्सव काळात नागरिकांना सुरक्षितता वाटावी म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Share This Article
Exit mobile version