-राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसीच्या स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश
आळंदी (अर्जुन मेदनकर) : वन महोत्सवानिमित्त श्री शाहू मंदिर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी डॉ. रमेश देसाई (कला विभागप्रमुख), डॉ. प्रवीण जाधव (वाणिज्य विभागप्रमुख), डॉ. राणी शितोळे (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), प्रा. भाऊसाहेब जाधव (राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी), डॉ. एस. पी. शेंडे (राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख), डॉ. मीना ठाकूर, प्रा. जीवन घाणेकर, प्रा. प्रतीक भोसले तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. “वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे,” असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षारोपणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने करण्यात आले असून संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

