अजितदादांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे नियोजन, तालुका व ग्रामस्तरीय समित्यांच्या नियुक्त्यांवर होणार चर्चा
चिखली (अंकुश पाटील) : चिखली तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचित करण्यात येते की, सोमवार, दि. १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा कार्याध्यक्ष श्री. शंतनू बोन्द्रे यांच्या अध्यक्षतेखाली जय भारत अर्बन, राजा टॉवर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस आवर्जून उपस्थित राहावे.
बैठकीत पक्षाचे सर्वेसर्वा तथा आपल्या सर्वांचे लाडके स्वर्गीय अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम व उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय समित्यांसाठी प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची नावे सर्वसंमतीने निश्चित करण्यात येणार आहेत. याशिवाय तालुका व शहरातून विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी सुचविण्यात येणाऱ्या इच्छुकांची नावे व त्यांची संपूर्ण माहिती बैठकीत सादर करावी. तसेच निवडणूक विभागाने उपलब्ध करून दिलेला BLA-2 फॉर्म प्रत्येकाने भरून बैठकीस सोबत आणावा. बैठकीत वरिष्ठांनी वेळोवेळी सूचित केलेल्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहून बैठकीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

