-८ विद्यार्थ्यांना ९९+ पर्सेंटाइल, तर ९० विद्यार्थ्यांनी मिळवले ९०+ पर्सेंटाइल; गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : सुवर्णपदक विजेते प्रा. प्रमोद ढगे यांच्या मार्गदर्शनाखालील ढगे केमिस्ट्री क्लासेसने MHT-CET 2026 परीक्षेत पुन्हा एकदा दैदिप्यमान यश संपादन करत गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यंदा क्लासेसमधील ८ विद्यार्थ्यांनी ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाइल, तर तब्बल ९० विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामुळे जिल्हाभरातून प्रा. ढगे आणि विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यामध्ये तनय रोकडे (९९.८८), श्रद्धा काळे (९९.८१), मयुरेश शिंदे (९९.७७), ऋतुराज रोकडे (९९.५२), ओंकार जवक (९९.५१), खुशी गुगळे (९९.२५), मयूर पानमंद (९९.०२) आणि श्रेया घोलप (९९.०१) यांनी विशेष उल्लेखनीय यश मिळवत क्लासेसच्या यशात मानाचा तुरा खोवला. प्रा. प्रमोद ढगे हे त्यांच्या प्रभावी, सुलभ आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धतीसाठी विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असंख्य विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी, संशोधन तसेच विविध प्रतिष्ठित क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करण्यासाठी सक्षम केले आहे. माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण आणि वैयक्तिक मार्गदर्शन हीच त्यांच्या यशामागील प्रमुख ताकद मानली जाते. या यशानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी (पुणे) आणि दयान प्रसाद ग्लोबल युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह डॉ. नितीन पी. शेरजे, डॉ. डी. जी. भालके, डॉ. पुष्पराज वारके, डॉ. सुशील एस. बेनके आणि डॉ. डी. बी. करंजुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील संधी, करिअर नियोजन आणि स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करत गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पाटील-शेळके यांनी केले. प्रा. प्रभाकर गवांदे, प्रा. विवेक चौधरी आणि प्रा. सुरेश जावळे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक युवराज महांडुळे, सहव्यवस्थापिका मोनाली पवार आणि मेधा बासकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. प्रमोद ढगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करत, “योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते,” असा विश्वास व्यक्त केला. विद्यार्थ्यांवरील विश्वास, शिक्षणातील गुणवत्ता आणि सातत्यपूर्ण यशाच्या बळावर ढगे केमिस्ट्री क्लासेसने MHT-CET 2026 मध्ये पुन्हा एकदा आपला ठसा उमटविला आहे.

