७१ वर्षांची अखंड परंपरा जपत श्री संत लोटांगण महाराज गौळ दिंडी पंढरपूरकडे रवाना

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-आमदार राजेश बकाने यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत; सुख-समृद्धीसाठी श्री विठ्ठल चरणी प्रार्थना

वर्धा (प्रकाश कथले) : वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत गेल्या ७१ वर्षांपासून अखंड सुरू असलेली देवळी तालुक्यातील श्री संत लोटांगण महाराज देवस्थानची गौळ येथील दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात रवाना झाली. यावेळी देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आमदार राजेश बकाने यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी चरणी राज्यातील तसेच मतदारसंघातील जनतेच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीसाठी प्रार्थना केली. वारकरी संप्रदायाची शिस्त, सेवा, समता आणि भक्तीची परंपरा समाजाला सदैव प्रेरणा देणारी असून, अशा ऐतिहासिक दिंडींचे जतन व संवर्धन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या स्वागत सोहळ्यास श्री संत लोटांगण महाराज संस्थेचे अध्यक्ष रामदास बापू पवार, नीलेश कसणारे, नरेंद्रजी मदनकर, अमोल कसणारे, दीपक इंगळे, अशोक नागपुरे, संदीप लोणारे, महादेवराव दागाने, प्रकाश चांभारे, संतोष भोयर तसेच वारकरी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version