आळंदीत पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-१९ केंद्रांवर ९८ टक्के लसीकरण पूर्ण; अतिरिक्त संचालकांनी केंद्रांना भेट देत कामकाजाची केली पाहणी

आळंदी (अर्जुन मेदनकर) : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आळंदी परिसरातील १९ केंद्रांवर पल्स पोलिओ लसीकरण मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या बालकांना लसीकरणासाठी आणून पोलिओ प्रतिबंधक डोस पाजला.

मोहिमेची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे तसेच एसएमओ डॉ. चेतन खाडे यांनी आळंदी ग्रामीण रुग्णालय आणि श्री माऊली मंदिर परिसरातील पोलिओ बूथला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी-खेड व आळंदी-हवेली परिसरातील १९ केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबविल्यामुळे परिसरात उद्दिष्टाच्या जवळपास लसीकरण पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेदरम्यान आळंदी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, कालिदास तापकीर, रुग्ण हक्क समितीचे सदस्य डी. डी. भोसले पाटील, ग्लोबल समाज सहाय्यक समितीचे मार्गदर्शक रामचंद्र (काका) कुऱ्हाडे पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर आदी मान्यवरांनी विविध केंद्रांना सदिच्छा भेट देऊन बालकांना पल्स पोलिओचे डोस पाजले तसेच मोहिमेची माहिती घेतली. लसीकरण मोहिमेसाठी एकूण ६,२५८ बालकांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ६,१३४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात आली, म्हणजेच सुमारे ९८ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले. उर्वरित बालकांचे लसीकरणही पुढील टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version