पुणे राष्ट्रभक्ती परिवारतर्फे नंदकुमार वडगावकर यांना समाजसेवा पुरस्कार

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-आळंदीच्या ज्येष्ठ समाजसेवकाच्या कार्याचा गौरव; पत्रकार भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आळंदी शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांना पुणे राष्ट्रभक्ती परिवाराच्या वतीने ‘समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. आळंदी देवाची येथील सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेत उद्योजक तथा समाजसेवक नंदकुमार वडगावकर यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने त्यांना सन्मानपत्र, राष्ट्रभक्तीची तिरंगी शाल आणि पदक देऊन गौरविण्यात आले. बिग बॉस मराठी फेम अभिनेते अभिजीत बिचुकले, संस्थेचे सुनील गोरे तसेच प्रसिद्ध सायकलपटू फोटो बेलगावकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कला, क्रीडा, साहित्य, रुग्णसेवा, वृक्षारोपण, अंधसेवा, रक्तदान, कुस्ती आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर नंदकुमार वडगावकर यांनी हा सन्मान समाजकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. तसेच भविष्यातही सामाजिक बांधिलकी जपत जनसेवेचे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

Share This Article
Exit mobile version