-शेतकऱ्यांचे निवेदन; नायब तहसीलदारांकडून अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील अंतरी-खेडेकर-रोडा रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अंतरी खेडेकर व रोडा येथील शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांना निवेदन सादर केले.
या मागणीची तात्काळ दखल घेत नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी संबंधित तलाठ्यांना कामातील अडचणी दूर करून रस्त्याचे मातीकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी संजय खेडेकर, पंजाब खेडेकर, शिवाजीराव खेडेकर, नारायण खेडेकर, उत्तम माळेकर, दगडू खेडेकर, एकनाथ खेडेकर, राहुल टाकळकर, दीपक काळंगे, सागर खरात, अनिल बबलू, विजय मोरे, आत्माराम पडघान, समाधान मोरे आदी उपस्थित होते.

