अमेरिकेतील शिकागो येथे देहूकर मोरे महाराजांची ऑनलाइन प्रवचन सेवा

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यात्म पीठात हरिनाम गजरात भक्तिमय सोहळा; श्रोत्यांनी घेतला अध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ

आळंदी (अर्जुन मेदनकर) : अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या अध्यात्म पीठाच्या वतीने ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांची ऑनलाइन प्रवचन सेवा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या या प्रवचन सेवेला शिकागोसह विविध ठिकाणांतील मराठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संत तुकाराम महाराजांच्या वंशपरंपरेतील ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांच्या मुखातून अध्यात्म, भक्ती आणि वारकरी संप्रदायावरील विचार ऐकण्याची संधी लाभल्याने श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले. प्रवचनादरम्यान हरिनामाचा गजर आणि भक्तिरसपूर्ण वातावरणामुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक अनुभूती मिळाली. प्रवचनानंतर अनेक श्रोत्यांनी महाराजांना विविध पारमार्थिक प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. जीवनमूल्ये, नामस्मरण, अध्यात्मिक साधना आणि वारकरी परंपरेविषयी महाराजांनी सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हरिनामाच्या गजरात संपन्न झालेल्या या ऑनलाइन प्रवचन सेवेबद्दल महाराष्ट्र मंडळ शिकागोच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. अमेरिकेतील मराठी समाजासाठी अशा अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन पुढेही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Share This Article
Exit mobile version