‘व्हाईस ऑफ मीडिया’ची मेहकर तालुका कार्यकारिणी जाहीर

editor 2 Min Read
2 Min Read

– समाधान म्हस्के-पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी वर्णी

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – तमाम पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून देशातील १७ राज्यांमध्ये कार्यरत असलेली संघटना म्हणून ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या संघटनेची ओळख आहे. संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ अध्यक्ष अनिल म्हस्के यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारिणीला दिलेल्या निर्देशानुसार, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, कार्याध्यक्ष अरुण जैन, सिद्धेश्वर पवार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांचे तालुका अध्यक्ष जाहीर केले आहेत. त्यात संघटनेच्या मेहकर तालुकाध्यक्षपदी पत्रकार संतोष मलोसे यांची नियुक्ती झाली आहे. तर, मालोसे यांनी संघटनेची कार्याध्यक्ष सिद्धेश्वर पवार यांच्या निर्देशानुसार, तालुका कार्यकारणी जाहीर केली असून, तालुका कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी रफिक कुरैशी, नागेश कांगणे या ज्येष्ठ पत्रकारांची तर समाधान म्हस्के-पाटील यांची तालुका उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

व्हाईस ऑफ मीडियाची मेहकर तालुका उर्वरित कार्यकारिणी अशी आहे, सरचिटणीस – गणेश सवडतकर, सहसरचिटणीस सचिन गाभने, खजिनदार /कोषाध्यक्ष – जमीर शहा, कार्यवाहक – विष्णू राजगुरू, संघटक – कैलास राऊत, प्रसिद्धी प्रमुख- फिरोज शहा तर सदस्यांमध्ये सुनील मोरे, युनूस बागवान, विवेक देशमुख, ज्ञानेश्वर इंगळे यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. या कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून जयचंद बाठीया, प्रदीप जोशी, ज्ञानदेव मानवतकर, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष भरत सारडा, जुगराज पंठ्ठे सर, प्रविण गायकवाड, गजानन देशमुख हे असणार आहेत. मेहकर तालुका कार्यकारिणीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. समाधान म्हस्के-पाटील यांची या कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोकभाऊ थोरहाते, सहसचिव आत्मानंद थोरहाते, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version