-स्मार्ट मीटरला गावकऱ्यांचा ठाम विरोध; जादा बिले कमी करण्याचे महावितरणचे आश्वासन
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अव्वाच्या सव्वा वीजबिले येत असल्याचा आरोप करत देऊळगाव साखरशा येथील वीज ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जादा आलेली वीजबिले कमी करून मीटर बदलून द्यावेत, अशी मागणी ग्राहकांनी १५ जून रोजी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत केली.
या आश्वासनानंतर ग्राहकांचा रोष काहीसा कमी झाल्याचे दिसून आले. मात्र, भविष्यात देऊळगाव साखरशा येथे स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी पुन्हा दिला. यावेळी प्रशासक संदीप अल्हाट, सागर समुद्रवार, बी. एम. राठोड, ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखेडे, शेख गुलाब, वायरमन विनोद राठोड, निलेश राठोड, तंत्रज्ञ कैलास गिते, प्रवीण भाकरे, पत्रकार नवल राठोड, सागर पायघन, ओम सोनोने, संतोष रोतळे, विनोद मोरे, भीमराव वानखेडे, विश्वास सरदार, शेख गफ्फार, लक्ष्मीबाई पायघन, सिंधुबाई सुर्वे, परमेश्वर गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने वीज ग्राहक उपस्थित होते. दरम्यान, या प्रश्नावरून जानेफळ येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, कनिष्ठ अभियंता अमोल बेंडेवार यांनी स्वतः ग्रामपंचायत कार्यालयात येऊन ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्याने ग्रामस्थांचा वेळ आणि खर्च वाचल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

