पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांचा आळंदीत वाढदिवस उत्साहात साजरा

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-माऊली मंदिरात पूजा-अभिषेक; सिद्धबेट येथे वृक्षारोपण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

आळंदी (अर्जुन मेदनकर) : पद्मश्री ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी येथे विविध सामाजिक, धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी मंदिरात श्रींच्या वैभवी चल पादुकांवर अभिषेक व विशेष पूजा करण्यात आली. तसेच सिद्धबेट येथे वृक्षारोपण कार्यक्रम आणि स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

यावेळी संयोजक अर्जुन मेदनकर, बाळासाहेब चौधरी, सुरेशभाऊ टाकळकर, प्रकाश पाचारणे, रोहिदास कदम, सचिन तापकीर, अमित गडदे, गौतम पाटोळे, शिवाजी कारेकर गुरुजी, बाजीराव नाना लोखंडे, बाबासाहेब भंडारे, हमीद शेख तसेच श्रींचे पुजारी राजाभाऊ चौधरी यांच्या उपस्थितीत वेदमंत्रांच्या घोषात पूजा-अर्चा करण्यात आली.

अण्णासाहेब हजारे यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे यासाठी विशेष प्रार्थना करून श्रीचरणी साकडे घालण्यात आले. यानंतर स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ मान्यवरांचा सन्मानपत्र, शाल, उपरणे आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक दत्तात्रय सातपुते, जाणीव जागृती मंच खेडचे अध्यक्ष विठ्ठल भोर, सुनील मांजरे, सतीश चांभारे, आरुडे गुरुजी, गोविंद बुट्टे, ॲड. निलेश आंधळे, खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गवते, हिरामण पडवळ, सुवर्णाताई काळे, डॉ. ज्योत्स्ना आवारी, मनोहर दिवाणे, गोरक्षनाथ महाराज वर्पे, कुंडलिक चौधरी, माऊली चौधरी, सचिन तापकीर, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, रोहिदास कदम आदींचा समावेश होता. सिद्धबेट येथे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन अर्जुन मेदनकर, बाळासाहेब चौधरी, गौतम पाटोळे, प्रकाश पाचारणे आदींनी केले. अण्णासाहेब हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध उपक्रमांमुळे आळंदी परिसरात सामाजिक, धार्मिक आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

Share This Article
Exit mobile version