-काशी केदारेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक वारसा धोक्यात; वन विभागाची तातडीची कारवाई
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील काशी केदारेश्वर मंदिर परिसरातील ऋषी नागार्जुन गुहा, पुरातन शिवपिंड, नंदी आणि इतर ऐतिहासिक अवशेषांच्या अस्तित्वावरच संकट ओढवल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या परिसरातील पुरातन वारसा नष्ट करून बेकायदेशीर बांधकाम उभारण्याचा प्रयत्न होत असल्याने ग्रामस्थ, भाविक आणि इतिहासप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चौकट
एक टन वजनाचा नंदी गायब!
नागलवाडी येथील प्राचीन नागार्जुन गुहा परिसरातील सुमारे एक टन वजनाचा भग्नावस्थेतील दगडी नंदी रहस्यमयरीत्या गायब झाला आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या या मंदिरातील महत्त्वाचा अवशेष नाहीसा झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून, प्रकरणाची चौकशी करून नंदीचा शोध घेण्याची मागणी केली आहे. मंदिर परिसरातील पुरातन अवशेषांच्या सुरक्षेचाही प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
चौकट
“हा परिसर वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने घटनास्थळी भेट देऊन बेकायदेशीर सुरू असलेले बांधकाम बंद करण्यात आले आहे.”
– विजय पालवे, वनरक्षक
चौकट
“ज्या ऋषींच्या नावावरून नागलवाडीची ओळख निर्माण झाली, त्या ऋषींच्या वारशाचे पुरावेच आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुमारे एक टन वजनाचा नंदी गायब होतो आणि पुरातन अवशेषांच्या शेजारी बांधकाम सुरू होते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”
– बाळासाहेब ढाकणे, ग्रामस्थ

