झी २४ तासवर डॉ. एकनाथराव ढाकणे यांचे ‘व्यावसायिक शिक्षणातील संधी’ विषयावर मार्गदर्शन

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-विद्यार्थी, पालक व युवकांसाठी उपयुक्त ठरणार विशेष मुलाखत

शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : डॉ. एकनाथराव ढाकणे यांची ‘व्यावसायिक शिक्षणातील संधी’ या विषयावरील विशेष मुलाखत दि. १८ जून २०२६ रोजी दुपारी २.२५ वाजता झी २४ तासवरील ‘हॅलो २४ तास’ या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

बदलत्या शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक शिक्षणाचे वाढते महत्त्व, रोजगाराच्या नव्या संधी, कौशल्याधारित शिक्षणाची गरज तसेच विद्यार्थ्यांनी करिअरची योग्य दिशा कशी निवडावी, याबाबत डॉ. ढाकणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. अभियांत्रिकी, व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, उद्योग-शिक्षण समन्वय आणि उद्योजकतेच्या संधींबाबतही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून जागतिक स्पर्धेत स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन त्यांनी या मुलाखतीत केले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि करिअरविषयक मार्गदर्शन घेऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही मुलाखत निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याने सर्वांनी हा कार्यक्रम आवर्जून पाहावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version