-जिल्हा सचिवपदी शेवगावचे प्रा. डॉ. नितीन मालानी यांची निवड
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : शेवगाव माहेश्वरी युवक मंडळाच्या अध्यक्षपदी अविनाश नंदकिशोर सारडा तर सचिवपदी दर्शन राधेश्याम मुंदडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील बालाजी मंदिर येथे रविवारी माहेश्वरी समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा माहेश्वरी सभेच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी पाथर्डी येथील श्रीकांत जाजू, जिल्हा सचिवपदी शेवगावचे प्रा. डॉ. नितीन मालानी, तर संयुक्त मंत्रीपदी डॉ. पुरुषोत्तम बिहाणी यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष मनीष बाहेती यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल समाज बांधवांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. यानंतर माहेश्वरी युवक मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अविनाश सारडा व सचिवपदी दर्शन मुंदडा यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
युवक मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : अविनाश नंदकिशोर सारडा
सचिव : दर्शन राधेश्याम मुंदडा
खजिनदार : महेश राजगोपाल राठी
उपाध्यक्ष : गोपाल सत्यनारायण मुंदडा
उपाध्यक्ष : सिद्धार्थ देवकिसन बलदवा
सहसचिव : रघुनंदन द्वारकानाथ बिहाणी
संघटन मंत्री : उज्वल महेश धुत
क्रीडा मंत्री : विश्वेश दीपक बलदवा
प्रचार मंत्री : आयुष प्रकाश लड्डा
आरोग्य मंत्री : डॉ. अंकित अशोक राठी
सांस्कृतिक मंत्री : ईश्वर महेश परतानी
बैठकीत युवक मंडळाचे मावळते अध्यक्ष कन्हैया सारडा व सचिव महेश राठी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास तालुका माहेश्वरी सभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गौरव बाहेती, विविध पदाधिकारी तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

