ग्रामपंचायत निवडणुकीची लगबग; इच्छुकांची धाकधूक वाढली!

admin Add a Comment 4 Min Read
4 Min Read

-मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ११ व १२ जूनला

-आरक्षण जाहीर होताच पॅनल निर्मिती व बैठकींचा धुरळा उडणार

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींचा समावेश असून, ११ व १२ जून रोजी संबंधित गावांमध्ये आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी निलेश मडके यांनी ग्रामपंचायतनिहाय अध्यासी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढली असून, आरक्षण जाहीर होताच पॅनल निर्मिती व बैठकींचा धुरळा उडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मेहकर तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला सदस्यपदांसाठीचे आरक्षण ११ व १२ जून रोजी संबंधित गावांमध्ये ग्रामसभेद्वारे निश्चित करण्यात येणार आहे. तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने यासाठी चोख तयारी केली आहे.

यानुसार निवासी नायब तहसीलदार एन. एस. बोरकर यांची नायगाव दत्तापूर व ब्रह्मपुरी ग्रामपंचायतींसाठी अध्यासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवासी नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांच्याकडे गोमेधर व मादणी, नायब तहसीलदार (संगायो) व्ही. व्ही. नालट यांच्याकडे देऊळगाव साकरशा व शहापूर, निवासी नायब तहसीलदार (निवडणूक) आर. यू. कावळे यांच्याकडे विश्वी व राजगड, मंडळ अधिकारी पी. के. मेटांगळे यांच्याकडे फैजलापूर व शिवाजीनगर, मंडळ अधिकारी एस. डी. कापसे यांच्याकडे मांडवसमोर डोंगर व मोहना बुद्रुक, मंडळ अधिकारी एम. एस. गायकवाड यांच्याकडे लोणी गवळी व मोळा, मंडळ अधिकारी एस. एस. डोईफोडे यांच्याकडे आरेगाव व गोहोगाव, मंडळ अधिकारी के. बी. इप्पर यांच्याकडे अंजनी बु. व बोरी, मंडळ अधिकारी आर. एल. आव्हाळे यांच्याकडे देऊळगाव माळी व सावंगीवीर, मंडळ अधिकारी व्ही. डी. मोगल यांच्याकडे विवेकानंदनगर व शेलगाव काकडे, मंडळ अधिकारी जी. एन. महाजन यांच्याकडे कासारखेड व सारशिव, मंडळ अधिकारी एस. एल. सोळंके यांच्याकडे मोहना खुर्द व सावत्रा, मंडळ अधिकारी जी. के. ढोके यांच्याकडे दादुलगव्हाण व गणपूर, मंडळ अधिकारी आर. जे. चनखोरे यांच्याकडे शेलगाव देशमुख व पांगरखेड, विस्तार अधिकारी एस. एस. गवई यांच्याकडे बोथा व घाटनांद्रा, विस्तार अधिकारी सुरेश मवाळ यांच्याकडे कणका बुद्रुक व गजरखेड, विस्तार अधिकारी एस. बी. पंडागळे यांच्याकडे हिवरा खुर्द व उमरा, विस्तार अधिकारी जी. डी. जाधव यांच्याकडे वरूड व शेंदला, मंडळ कृषी अधिकारी एस. एन. अंभोरे यांच्याकडे लावणा व शहापूर, तर मंडळ कृषी अधिकारी व्ही. एच. राजूरकर यांची जवळा ग्रामपंचायतीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

विस्तार अधिकारी एस. बी. काळे व एस. पी. मेटांगळे तसेच सहायक महसूल अधिकारी जवरे व सोनुने यांना राखीव ठेवण्यात आले आहे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामसभेद्वारे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्यांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही विहित वेळेत पूर्ण करावी. या कामात हयगय झाल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही तहसीलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, आरक्षण सोडतीपूर्वी इच्छुकांची धाकधूक चांगलीच वाढल्याचे दिसून येत आहे. आरक्षण जाहीर होताच गावागावांत पॅनल निर्मिती व बैठकींना वेग येणार असल्याचे चित्र असून, निवडणुकीच्या राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग येणार आहे.

Share This Article
Exit mobile version