जानेफळ पोलिसांकडून गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त!

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-१३ हजारांचा मुद्देमाल जप्त; एकाला ठोकल्या बेड्या

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील जानेफळ पोलिसांनी आपल्या हद्दीतील पाथर्डी येथे अवैधरित्या हातभट्टी दारूची निर्मिती व साठवणूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कर्तव्यदक्ष ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ३ जून रोजी छापा टाकला. या कारवाईत अवैध दारूची भट्टी उद्ध्वस्त करून एका आरोपीस बेड्या ठोकण्यात आल्या.

सदर कारवाईदरम्यान आरोपी दत्ता उत्तम चव्हाण (वय ५२ वर्षे, रा. पाथर्डी, ता. मेहकर) याच्या ताब्यातून ९ लिटर हातभट्टी दारू, गुळमिश्रित मोह सडवा (किंमत रु. ११,५००) तसेच १६ टपरी पिपे असा एकूण रु. १२,८२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्र. १८१/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव यांनी दिली असून, गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ काकड यांनी केली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार आजिनाथ मोरे, पोलीस उपनिरीक्षक संतोष जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पवार व पोलीस कॉन्स्टेबल विष्णू जगताप यांनी संयुक्तपणे पार पाडली. अवैध दारूची निर्मिती, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version