ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनतर्फे अभिराजमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केला प्रोत्साहनाचा उपक्रम

आळंदी (अर्जुन मेदनकर) : वाकड येथील अभिराज फाउंडेशन या दिव्यांग मुलांच्या शाळेत ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संचालक डॉ. योगेश सामनेकर, डॉ. सुनिता सामनेकर, संजय मुळे, भारती वाणी आणि सविता मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान संस्थेतील विद्यार्थ्यांनी मान्यवरांना वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे नियोजन विकास जगताप, योगेश आढाळे, ऋषिकेश मुसुडगे आणि विनायक जुनावणे यांनी केले. सूत्रसंचालन अंजना चिगरे यांनी केले. यावेळी संस्थेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून उत्साहात करण्यात आली.

Share This Article
Exit mobile version