मेरा बुद्रुक शिवारातून दोन लाखांचा अवैध लाकूडसाठा जप्त; निम व इतर प्रजातींचे लाकूड विनापरवाना साठवून ठेवल्याचा प्रकार उघड
देऊळगाव घुबे (तालुका प्रतिनिधी) : चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक शिवारात वन विभागाने धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेला सुमारे दोन लाख रुपयांचा निम व इतर अडजात प्रजातींच्या लाकडाचा साठा जप्त केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे २८ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.
वन विभागाने तत्काळ कारवाई करत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सदर कारवाई वनरक्षक गजानन माणिकराव पोटे, अंचरवाडी बिटचे वनसेवक ऋषिकेश तुपकर यांनी पार पाडली. या कारवाईसाठी सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व कँपा बुलढाणा वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी बुलढाणा सुनील वाकोडे यांचे मार्गदर्शन लाभले. तर या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल प्रदीप प्रकाश मुंढे करीत आहेत.


