-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
-पेट्रोल पंपांवर अतिरिक्त गर्दी न करण्याचे प्रशासनाचे जनतेला साकडे
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे. पेट्रोल पंपांवर अतिरिक्त गर्दी टाळावी तसेच घाबरून जाऊन इंधनाची साठवणूक करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी सांगितले की, पुढील काळातही दररोज इंधनाचा पुरवठा सुरळीतपणे सुरू राहणार आहे. जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या तसेच पेट्रोल पंप चालकांच्या सतत संपर्कात असून, जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल सुरळीत उपलब्ध होत आहे. इंधन वितरण सुरळीत राहावे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

