-मेहकर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन; शेतकऱ्यांना डीएपी खत तातडीने उपलब्ध करण्याची मागणी
मेहकर (मेहकर प्रतिनिधी) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, खतांच्या वाढीव दरांवर नियंत्रण ठेवणे तसेच कृषी सेवा केंद्रांकडून होत असलेली “लिंकिंग विक्री” तात्काळ बंद करण्याच्या मागणीसाठी मेहकर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.


