आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड यांची निवड

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-व्हिएतनाम येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व

आळंदी (अर्जुन मेदनकर) : जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने २२ ते २६ मे २०२६ दरम्यान व्हिएतनाम येथे आयोजित करण्यात आलेल्या २३ वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी प्रा. दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती संघाच्या वतीने तांत्रिक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्या पिढीसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची ही त्यांची तब्बल ६९ वी स्पर्धा ठरणार आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर २०० हून अधिक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर ६९ स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव तांत्रिक अधिकारी ठरले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर आण्णा मोहळ, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस, सरचिटणीस योगेश दोडके, कार्याध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके तसेच पै. बाळासाहेब चौधरी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version