-शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू व सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक सुभाष आठरे यांचे नुकतेच निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७० वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक तसेच नागरिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सुभाष आठरे यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक मूल्यांची जपणूक यासाठी ते विशेष ओळखले जात होते. त्यांच्या कार्यामुळे शिक्षण क्षेत्रात त्यांना मोठा मान व आदर प्राप्त झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, दोन मुली, पुतणे, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते शेवगाव येथील अमरावतीचे उपजिल्हाधिकारी संतोष काकडे तसेच उद्योजक अमोल गिते यांचे सासरे होत. त्यांच्या निधनाने परिसरातील शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

