चिखली येथे झोन स्तरीय संत निरंकारी महिला समागमाचे आयोजन

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-महिलांसाठी विशेष सत्संग, प्रवचन व ब्रह्मज्ञान कार्यक्रम; लंगर प्रसादाचीही व्यवस्था

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : संत निरंकारी मिशनतर्फे झोन क्रमांक ३६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा विभागाच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे झोन स्तरीय संत निरंकारी महिला समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपेने आयोजित करण्यात येणारा हा विशेष समागम महिलांसाठी आध्यात्मिक प्रेरणा व सत्संगाचा पर्व ठरणार आहे. हा कार्यक्रम रविवार, दिनांक १७ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत परमहंस रामकृष्ण मौनीबाबा मठ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, चिखली येथे संपन्न होणार आहे. समागमामध्ये महिलांसाठी विशेष सत्संग, आध्यात्मिक प्रवचन व भक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प.पू. मनीषा ताई चंचलाणी (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार असून त्या उपस्थित महिला भगिनींना अध्यात्म, मानवता आणि सद्भावनेचा संदेश देणार आहेत. आयोजकांच्या वतीने परिसरातील सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सत्संग व प्रवचनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. समागमानंतर उपस्थितांसाठी लंगर प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून इच्छुक भक्तांना ब्रह्मज्ञान अर्थात देवाची ओळख करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सेवादल सदस्यांकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version