रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूलचा दहावीला शंभर टक्के निकाल

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-विशाखा घुबे ठरली प्रथम; ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यम शाळेची दमदार कामगिरी

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात अल्पावधीतच नावारूपास आलेल्या देऊळगाव घुबे येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश School अँड ज्युनियर कॉलेजने दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. २०२६ मध्ये पार पडलेल्या दहावीच्या परीक्षेत शाळेतील सर्व २९ विद्यार्थी उच्च प्राविण्य श्रेणीचे गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयातील कु. विशाखा गणेश घुबे हिने ९७ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. वैष्णवी राजेंद्र पैठणे हिने ९६.८० टक्के गुणांसह द्वितीय स्थान मिळवले, तर कु. श्रुती रवींद्र भुसारी आणि कु. प्राची रामेश्वर थुट्टे यांनी प्रत्येकी ९६.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. विद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी ९० ते ९७ टक्क्यांदरम्यान गुण मिळवत विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तसेच ८५ ते ८९ टक्क्यांदरम्यान २ विद्यार्थी तर ७५ ते ८० टक्क्यांदरम्यान १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाची गुणवत्ता सिद्ध केल्याने विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा गौरव अधिक वाढला आहे.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाची इंग्रजी माध्यमाची ही दुसरी शाखा असून ग्रामीण भागात मिळवलेले हे यश पालकांसाठी आणि परिसरासाठी अभिमानाची बाब ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाचे संस्थाध्यक्ष शेनफडराव घुबे यांनी स्वागत केले असून संस्थेचे सचिव प्रा. उद्धव घुबे आणि प्राचार्य अमोल घुबे यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Share This Article
Exit mobile version