शालेय पोषण आहार कामगार संघटनेत बुलढाण्याला मानाचा बहुमान

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-राज्यस्तरावर मिळाली दुहेरी संधी

अंकुश पाटील (चिखली) : महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सीटूचे तिसरे राज्य अधिवेशन दि. २८ व २९ एप्रिल २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी कॉ. प्रा. ए.बी. पाटील (कोल्हापूर), जनरल सेक्रेटरीपदी कॉ. डॉ. अशोक थोरात (बीड) आणि खजिनदारपदी कॉ. मीराताई शिंदे (बीड) यांची फेरनिवड करण्यात आली.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे प्रथमच कॉ. ज्ञानेश्वर वाघमारे यांची राज्याच्या सहसचिवपदी निवड झाली असून, ज्योतीताई आराख यांची राज्य कौन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राज्यातील ४५ प्रतिनिधींच्या कौन्सिलमध्ये बुलढाणा जिल्ह्याला एक पदाधिकारी आणि एक कौन्सिल मेंबर मिळण्याचा मान प्रथमच प्राप्त झाला आहे.

या निवडीमुळे जिल्ह्याला राज्यस्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली असून, या यशाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. पंजाबराव गायकवाड यांच्यासह प्रतिभा पाटील, ललिता बोदडे, मंदा डोंगरदिवे, जयश्री तायडे, निशा घोडे, शोभा काळे, समाधान राठोड, संभाजी डंगवार, रेखा जाधव, उषा डुकरे, राजू गिरी, मालता खरात, छाया खंडारे, शारदा खंडेराव आदींनी अभिनंदन केले आहे. या निवडीमुळे संबंधितांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version