आमदार सिद्धार्थ खरातांची सामाजिक बांधिलकी; प्रवाशांसाठी थंड पाण्याची सोय

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-मेहकर बसस्थानकावर पानपोई सुरू; १५ दिवसांत नवीन एसटी आगार व १५ बसेस सेवेत

मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तीव्र उष्णतेमुळे प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत मेहकर येथील बसस्थानकावर ३ मेपासून स्वखर्चातून पानपोई सुरू केली आहे. वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून प्रवाशांना पाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत. ही परिस्थिती ओळखून आमदार खरात यांनी पुढाकार घेत पानपोई सुरू केली. या पानपोईचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कडक उन्हात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी, “राजकारणापेक्षा माणूस श्रेष्ठ असून जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगितले. तसेच वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, मेहकर येथील नवीन एसटी आगार येत्या १५ दिवसांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून या आगाराला लवकरच १५ नवीन एसटी बसेस मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या वेळी नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, एसटी आगाराचे कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version