– जानवी चव्हाण प्रथम, सुरज पवार द्वितीय, प्रांजल जायभाय तृतीय; विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट यश
बिबी (तालुका प्रतिनिधी) : अमरावती बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २ मे २०२६ रोजी जाहीर झाला असून, किनगाव जट्टू येथील वसंतराव नाईक इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजने यंदाही १०० टक्के निकाल लावत आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे.
विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उत्कृष्ट यश संपादन करत अभ्यास केल्यास कोणतीही गोष्ट कठीण नसते हे सिद्ध करून दाखवले आहे. या शाळेचा यापूर्वीही उत्कृष्ट निकाल लागलेला असून यंदाही तीच परंपरा कायम ठेवण्यात यश आले आहे. या निकालात कुमारी जानवी चव्हाण हिने ८७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. सुरज निळकंठ पवार याने ८५.६७ टक्के गुणांसह द्वितीय, तर कुमारी प्रांजल जायभाय हिने ८५.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. महाविद्यालयातील जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी उच्च टक्केवारीसह उत्तीर्ण होत शाळेचे तसेच आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.