– साकेगाव येथे बुद्ध जयंतीनिमित्त व्याख्यान व खीरदान कार्यक्रम उत्साहात
चिखली (तालुका प्रतिनिधी) : “भारतीय संविधानाने स्वीकारलेली सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाहीची तत्त्वे ही भगवान बुद्धांच्या धम्मातूनच प्रेरित आहेत. त्यामुळे संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालणे, म्हणजेच खऱ्याअर्थाने सुंदर धम्माचरण करणे होय,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सत्यशोधकी विचारवंत तथा सत्यशोधक शिक्षक सभेचे राज्याध्यक्ष डॉ. श्याम मुडे यांनी केले.
याप्रसंगी संविधान जागर समितीचे कार्यकर्ते हरी राऊत आणि अभिजीत राजे यांनी उपस्थितांना ‘भगवान बुद्ध आणि भारतीय संविधान’ या विषयावरील माहितीपत्रकांचे वाटप केले. व्याख्यानानंतर समाजबांधवांच्यावतीने खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला साकेगावमधील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र निकाळजे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक निकाळजे, प्रवीण निकाळजे, प्रमोद निकाळजे, प्रभाकर निकाळजे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

