-सर्व ९९ विद्यार्थी उत्तीर्ण; देवयानी जावळे प्रथम, शिवानी गावंडे द्वितीय, ऋतुजा घुबे तृतीय
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे येथील रामकृष्ण विवेकानंद इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने बारावी विज्ञान शाखेत १०० टक्के निकाल लावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. परीक्षेला बसलेले सर्व ९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाने ग्रामीण भागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या निकालात कु. देवयानी शरद जावळे हिने ९४.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. कु. शिवानी दत्तात्रय गावंडे हिने ९३.३३ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. ऋतुजा गणेश घुबे हिने ९२.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. निकालाचे विश्लेषण पाहता ९० ते ९५ टक्के दरम्यान १९ विद्यार्थी, ८५ ते ८९ टक्के दरम्यान ४१ विद्यार्थी, ८० ते ८४ टक्के दरम्यान २१ विद्यार्थी, ७५ ते ७९ टक्के दरम्यान १३ विद्यार्थी आणि ७० ते ७४ टक्के दरम्यान ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे गुण मिळवत यश संपादन केले आहे.
भारत शिक्षण प्रसारक मंडळाची इंग्रजी माध्यमातील ही दुसरी शाखा असून ग्रामीण भागात मिळालेल्या या यशामुळे पालक व परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शेनफडराव घुबे, सचिव प्रा. उद्धव घुबे आणि प्राचार्य अमोल घुबे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक केले.

