सातपुड्याच्या दुर्गम भागांतील रस्त्यांवरून जाणे म्हणजे तारेवरची कसरत!

editor 1 Min Read
1 Min Read

जिल्हा परिषदेची अनास्था ग्रामस्थांच्या जीवावर बेतणार!

नंदूरबार (आफताब खान) : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भागात अतिवृष्टीसोबत पावसाची सततधार सुरू असल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.  ग्रामीण भागातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

चिखलाने माखलेल्या रस्त्यांवरून माणसालाही चालणे शक्य नाही. अनेक पाड्यांवर चिखलामुळे समस्या निर्माण झाली आहेत.  तर दुसरीकडे गावात आजारी असलेल्या रुग्णांनाही रुग्णालया पर्यंत घेऊन जाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  अशीच परिस्थिती कायम असल्याने रुग्णांसोबत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामीण भागातील गावपाड्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Share This Article
Exit mobile version