युवा विचारपीठाकडून राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कारासाठी सौ. वृषाली देवानंद चौधरी यांची निवड

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल; १८ एप्रिल रोजी अकोला येथे होणार गौरव

लोणार (वाजिद खान) : अकोला येथील युवा विचारपीठ प्रतिष्ठानतर्फे सन २०२६ साठी जाहीर करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कारासाठी लोणार येथील समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सौ. वृषाली देवानंद चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजापर्यंत प्रेरणादायी विचार पोहोचवण्याचे कार्य त्या सातत्याने करत आहेत.

युवा विचारपीठ प्रतिष्ठान, अकोला ही संस्था सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असून समाजातील विविध घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने उपक्रम राबवते. अशाच प्रकारे प्रेरणादायी कार्य करणाऱ्या सौ. वृषाली चौधरी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी अकोला येथील प्रमिलाताई ओक हॉल येथे आयोजित कार्यक्रमात सौ. वृषाली देवानंद चौधरी यांना राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Share This Article
Exit mobile version