छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबीर मेरा खुर्द येथे संपन्न

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-गावपातळीवर महसूल समस्यांचे तत्काळ निराकरण; नागरिकांकडून समाधान व्यक्त

देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : देऊळगाव घुबे ता. चिखली :- महाराष्ट्र राज्य शासनाने प्रशासन गावपातळीवर गतिमान करण्यासाठी सुरू केलेले राजस्व समाधान शिबीर आज मेरा खुर्द येथे उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाले. शिबिरात नागरिकांच्या विविध महसूल संबंधित समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निवारण करण्यावर भर देण्यात आला. शिबिरामध्ये ७/१२ उतारा, फेरफार, वारस नोंद, जमिनीचे वाद, प्रमाणपत्रे आदी अनेक प्रकरणांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.

सोबतच महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ यावेळी नागरिकांना देण्यात आला. आरोग्य विभाग व कृषी विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. त्यांच्या संबंधित लोककल्याणकारी योजनांबाबतच्या अडचणी यावेळी सोडवण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ पोफळे यांनी केले. मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेले शेतरस्ते व पांधन रस्ते यांची कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच शेतकऱ्यांनी रस्त्यांसाठी नाहरकत तात्काळ द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सवडे यांनी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन सेवांचा उपयोग करावा, असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष परिहार, विस्तार अधिकारी गिते, सरपंच रमेश अवचार, मंडळ अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, महसूल अधिकारी, कृषी अधिकारी, आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या सेवा थेट गावपातळीवर मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Share This Article
Exit mobile version