पावर हाऊसला आग; दोन तास वीजपुरवठा ठप्प

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-देखभालीअभावी घटना? सुक्या गवताला लागलेल्या ठिणगीने पेट घेतल्याची शक्यता

लोणार (वाजिद खान) : विद्युत विभागाच्या मेहकर रोडवरील पावर हाऊसला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने पावर हाऊसचे नुकसान झाले. या आगीमुळे शहराचा वीजपुरवठा सुमारे दोन तास ठप्प राहिला.

आग लागल्यानंतर कर्मचारी व अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. मात्र वेळीच प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. तरीही या घटनेत पावर हाऊसचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, उच्च दाब वाढल्यामुळे पडलेल्या ठिणगीमुळे विद्युत रोहित्राजवळील सुक्या गवताने पेट घेतला आणि आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरवर्षी पावसाळा संपल्यानंतर पावर हाऊस परिसरातील गवत काढून देखभाल केली जाते. मात्र प्रत्यक्षात ही कामे न होता केवळ कागदोपत्री होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच अशा आगीच्या घटना घडत असल्याचा आरोप होत आहे. विद्युत विभाग दरवर्षी वृक्षतोड व साफसफाईसाठी खर्च करत असताना पावर हाऊस परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील अनेक ठिकाणी डीपीजवळही कचरा व सुक्या गवताचे ढीग दिसत असून, याकडे विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Exit mobile version