शेतकरी नेते सहदेव लाड यांना पितृशोक; वडील काळुबा लाड यांचे निधन

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास; वारकरी परंपरेत आयुष्य व्यतीत

बिबी (ऋषी दंदाले) : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचे वडील स्व. काळुबा अंबादास लाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिनांक १० एप्रिल रोजी संध्याकाळी दोन वाजता खापरखेड लाड येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.

आपण स्वतःचे जीवन जगत असताना समाजाचे काहीतरी देणे लागते या कार्यपद्धतीने जीवन जगणारे काळुबा अंबादास लाड यांनी आपले संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात घालवले. त्यांनी आपला एकुलता एक मुलगा शेतकरी चळवळीसाठी व शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी समर्पित केला होता. दरम्यान, त्यांना पूर्वीपासून फिट या आजाराची लागण होती. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील अपेक्स हॉस्पिटलमध्ये डॉ. माजिद यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मागील काही दिवसांत त्यांची प्रकृती अधिक ढासळली आणि अखेरीस १० एप्रिल रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर खापरखेड लाड येथे १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version