-बाबा आमटे साहित्य नगरीत काव्यरसिकांची मेजवानी; कविसंमेलन उत्तररात्रीपर्यंत रंगले
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : दि. १० व ११ एप्रिल दरम्यान ४५ वे मराठवाडा साहित्य संमेलन शांतीवनातील बाबा आमटे साहित्य नगरीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी कवी विठ्ठल बीडकर यांच्या मुख्य व्यासपीठावर सायंकाळच्या सत्रात बालाजी मदन इंगळे यांच्या अध्यक्षतेखालील काव्यसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरचे संचालक तथा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड यांनी केले.
या काव्यसंमेलनात अध्यक्ष बालाजी इंगळे यांनी ‘इराण-अमेरिका युद्ध’ ही कविता सादर करत सध्याच्या भीषण युद्ध परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत रसिकांना अंतर्मुख केले. नरसिंग इंगळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील सरकारची उदासीनता अधोरेखित केली, तर बालासाहेब झोडगे यांनी कास्तकाराच्या जीवनातील संघर्ष आणि आशेचे चित्रण केले. प्रमोद माने यांनी जमिनीच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करणारी कविता सादर केली, तर हरिष हातवटे यांनी शहरीकरण आणि गावसंस्कृतीतील विरोधाभास प्रभावीपणे मांडला. सत्यप्रेम लगड व विष्णू सुरासे, दादासाहेब सादोळकर यांच्या वात्रटिकांनी काव्यसंमेलनात विशेष रंगत आणली. बालाजी मुंढे, सीमा गुंड, निलिमा देशमुख, काशिनाथ बिराजदार, चंद्रशेखर मलकमपट्टे, बाळासाहेब गर्कळ, राजेंद्र सगर, सौ. वृषाली पाटील, उषा भोसलें, महादेव गायकवाड, मनोज खुटे, रंजना गायकवाड आदी कवींनी आपल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. काव्यसंमेलनाच्या शेवटी साहित्यिक अनंत कराड यांनी ‘केरसूनी’ या कवितेतून नव्या-जुन्यातील संघर्ष प्रभावीपणे उभा केला.
यावेळी बाळासाहेब नागरगोजे, द. ल. वारे, संगीता होळकर, सुरेश कायटे, जगन्नाथ कांबळे, सुधीर कांबळे, शिवाजी मरगीळ, शेखर गिरी, नागेश शेलार, गोविंद जाधव, महेंद्र खंडागळे, गणेश जाधव, अजय भराटे, बालाजी भागानगरे, अर्चना खोपडे, लक्ष्मण मलगीरवार, प्रभाकर शेळके, विद्या दिवटे, उषा भोसले, अलका सपकाळ, डॉ. रेखा ढगे, शिवनंदा माळी, सारिका बेद्रे, श्रीकृष्ण उबाळे, मनोज खुटे यांनीही आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या. संमेलनाध्यक्ष फ. म. शहाजिंदे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, उपाध्यक्ष आसाराम लोमटे, सहकार्यवाह गणेश मोहिते, डॉ. दिपाताई क्षीरसागर, कोषाध्यक्ष रामचंद्र काळुंखे, स्वागताध्यक्ष तथा शांतीवनाचे संचालक दिपककाका नागरगोजे, कावेरीताई नागरगोजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

