-बोधेगाव परिसरात अभिमानाचे वातावरण; युवकांसाठी प्रेरणास्थान
बोधेगाव (बाळासाहेब खेडकर) : तालुक्यातील सोनविहिर येथील सुपुत्र सुरेश सांगळे यांची नुकतीच पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात समाधान व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुरेश सांगळे यांनी आपल्या पोलिस सेवेला बीड येथून प्रारंभ केला होता. त्यानंतर खात्यांतर्गत त्यांची नियुक्ती एमआयडीसी वाळूज, छत्रपती संभाजीनगर येथे झाली आहे. त्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष व प्रामाणिक कार्यशैलीच्या जोरावर ही पदोन्नती मिळवली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सोनविहिर व बोधेगाव येथे पूर्ण झाले असून, ग्रामीण भागातून शिक्षण घेत त्यांनी कठोर परिश्रम व जिद्दीच्या बळावर पोलिस खात्यात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सुरेश सांगळे हे महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक रमेश सांगळे यांचे धाकटे बंधू असून, कुटुंबातील सेवाभावाची परंपरा त्यांनी पुढे चालवली आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

