चिखली तहसील कार्यालयामार्फत ‘समाधान शिबिराचे’ आयोजन

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

देऊळगाव घुबे(राजेंद्र घुबे) – सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयामार्फत विशेष ‘समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे.

चार ठिकाणी शिबिरांचे आयोजन

हे शिबिर पुढीलप्रमाणे विविध मंडळांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे –

  • १० एप्रिल २०२६ – जिल्हा परिषद शाळा, धोडप
  • १६ एप्रिल २०२६ – विश्रामगृह, मेरा खुर्द
  • १७ एप्रिल २०२६ – ज्ञानेश्वर विद्यालय, पेठ
  • २४ एप्रिल २०२६ – जिल्हा परिषद शाळा, शेळगाव आटोळ

महत्वाच्या सेवांचा समावेश

या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा’त विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये –

  • फेरफार प्रकरणे निकाली काढणे
  • पंतप्रधान आवास योजना व घरकुल योजनांचा लाभ
  • PM किसान योजनेअंतर्गत land seeding
  • नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे eKYC
  • डिजिटल ७/१२ व फेरफार वाटप
  • आधार नोंदणी व अद्ययावत सेवा
  • विविध दाखले (उत्पन्न, जात, अधिवास, नॉनक्रिमिलेर इ.)
  • मतदान कार्ड व आधार लिंकिंग
  • रेशन कार्ड सेवा व eKYC
  • जॉब कार्ड, आभा कार्ड वितरण
  • आरोग्य तपासणी व लसीकरण
  • प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना लाभ

शेतकऱ्यांसाठी विशेष सुविधा

शेतकऱ्यांसाठी Agristack अंतर्गत farmer ID, महा DBT योजनांचे लाभ (फळबाग, सिंचन, पॉलीहाउस, शेततळे इ.) तसेच पाणंद रस्ते योजना यांसारख्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे.

महत्वाचे शासन निर्णय

शेतजमीन अकृषिक (NA) करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची अट रद्द करण्यात आली असून आता एकदाच रूपांतरण शुल्क भरावे लागणार आहे. तसेच तुकडेबंदी कायद्यांतर्गत जुन्या व्यवहारांना नियमित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

नागरिकांना आवाहन

या शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार विजय सवडे यांनी चिखली तालुक्यातील नागरिकांना केले आहे.

Share This Article
Exit mobile version