-तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी; कमी खर्चात आधुनिक पद्धतीने उपचार
लोणार (वाजिद खान) : हनुमान जयंतीच्या निमित्ताने लोणार येथील सुप्रसिद्ध दंत चिकित्सक डॉ. बगडिया मॅडम यांच्या वतीने दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी गायत्री अॅडव्हान्स डेंटल क्लिनिक येथे पूर्ण दंत कवळी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक माप घेऊन कमी खर्चात दंत कवळी बसविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दंत कवळीची योग्य निगा कशी राखावी याबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशनही करण्यात येणार आहे. अलीकडील काळात दातांच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याने दातांची स्वच्छता, आरोग्य आणि सुंदर हास्य याबाबत जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी, विशेषतः गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. राजलक्ष्मी अग्रवाल यांनी केले आहे.

