आळंदीत ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ भेट देत मान्यवरांचा सत्कार; सामाजिक बांधिलकीचा संदेश

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे सेवेनिवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर भिकू चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात पार पडला. आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या समारंभात विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी पदाधिकारी व संस्था प्रतिनिधींना ग्रंथराज ‘श्री ज्ञानेश्वरी’ची प्रत भेट देत सामाजिक बांधिलकी जपत सत्कार करण्यात आला.

आळंदी नगरपरिषद शिक्षण मंडळ कर्मचारी वृंद, शिवसेना आळंदी शहर तसेच श्री आळंदी धाम सेवा समिती यांच्या वतीने आराधना गार्डन येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. आवेकर-भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर तसेच आळंदी जनहित फाउंडेशनचे सचिव रामदास दाभाडे यांच्या हस्तेही ज्ञानेश्वर चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

या समारंभास शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई कुऱ्हाडे, आवेकर-भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, माजी उपाध्यक्ष वासुदेव घुंडरे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, नगरसेवक सुरेश झोंबाडे, आदित्य घुंडरे, दिनेश घुले, गोविंद कुऱ्हाडे, गटनेते सचिन गिलबिले, उज्ज्वला काळे, कांचन येळवंडे, अनिकेत तापकीर, गोविंद ठाकूर, नंदकुमार वडगावकर, शशिकांत बाबर, सचिन महाराज शिंदे, बालकृष्ण मंडले, बाबासाहेब भंडारे, हनुमंत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या सेवा काळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. समारंभाची सांगता पसायदान गायन, हरिनाम गजर आणि स्नेहभोजनाने झाली.

Share This Article
Exit mobile version