आळंदीतील विविध संस्था-मंदिरांना देणगी; दिवाणे कुटुंबाचे दातृत्व

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-ज्ञानदीप शिष्यवृत्तीस ५ हजारांची मदत; सामाजिक बांधिलकीचा आदर्श

आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदीतील दिवाणे कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत विविध ग्रामदैवत, धार्मिक संस्था व सामाजिक उपक्रमांना आर्थिक मदत करून प्रेरणादायी कार्य केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सुरेश वडगावकर ज्ञानदीप शिष्यवृत्ती योजनेस दिवाणे कुटुंबीयांनी ५ हजार रुपयांची मदत दिली. कै. अंजनाबाई दिवाणे यांच्या दशक्रिया निमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्येष्ठ चिरंजीव मनोहर दिवाणे व परिवाराने ही देणगी सुपूर्द केली.

याशिवाय दिवाणे कुटुंबीयांनी आळंदी नगरपरिषद अंतर्गत इंद्रायणी स्वच्छता अभियान, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, श्री गोविंद महाराज केंद्रे संस्था, ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ परिवार, श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती, भैरवनाथ मंदिर, हजेरी मारुती मंदिर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, स्वकुळ साळी समाज ज्ञातीगृह तसेच दशक्रिया विधी घाट आदी विविध धार्मिक व सामाजिक संस्थांना आर्थिक मदत दिली. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रमांना बळ मिळत असून दिवाणे कुटुंबीयांच्या या कार्यामुळे इतरांनाही समाजकार्यात पुढे येण्याची प्रेरणा मिळत आहे.

Share This Article
Exit mobile version