थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टकडून ॲड. उमाप यांचा सत्कार

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-कलशारोहणासाठी ॲड. तापकीर यांचे सुवर्णदान; भाविकांना सहभागाचे आवाहन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टतर्फे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या पालखी सोहळा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ॲड. राजेंद्र उमाप यांचा सत्कार करण्यात आला. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ॲड. विष्णू तापकीर यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ मंदिराच्या कलशारोहणासाठी दोन तोळे सुवर्णदान जाहीर केले. यासाठी ३ लाख २५ हजार रुपयांचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला. हा धनादेश ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे देण्यात आला.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त थोरल्या पादुका मंदिरात भव्य कलशारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे ३० तोळे (३०० ग्रॅम) सोन्याची आवश्यकता असून भाविकांनी स्वेच्छेने सुवर्णदान किंवा देणगी स्वरूपात योगदान देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. यावेळी चंद्रकांत मोरे, साहेबराव काशीद, किरण बारवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version