जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-एप्रिल अखेरीस मतदान; १७ मार्चपासून आचारसंहिता लागू

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ५९ ग्रामपंचायतींमधील रिक्त सरपंच व सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकांमुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधींची निवड होणार असून प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत ७ ते १३ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्जांची छाननी १५ एप्रिल रोजी होणार असून अर्ज माघारीचा अंतिम दिनांक १७ एप्रिल २०२६ आहे. मतदान २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडणार आहे. तर मतमोजणी २९ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच १७ मार्च २०२६ पासून संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निकाल जाहीर होईपर्यंत ही आचारसंहिता प्रभावी राहणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व संबंधित यंत्रणांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून नागरिकांनी लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

Share This Article
Exit mobile version