वीज जोडणीसाठी खांबावर चढलेल्या खाजगी वायरमनचा मृत्यू

editor 1 Min Read
1 Min Read

बुलडाणा – विद्युतपुरवठा खंडित झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी खांबावर चढलेल्या खाजगी वायरमनचा अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना खामगाव तालुक्यातील नांद्री येथे १४ जूनच्या संध्याकाळी ५ वाजता घडली.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील नांद्री येथील नागेश चोपडे वय 30 हा खाजगी वायरमन आहे. 14 जून रोजी ढगाळ वातावरण व हवा सुटल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो जोडण्यासाठी नागेश खांबावर चढला होता. मात्र अचानक गावातील रोहीत्रावरून वीजपुरवठा सुरू झाल्याने नागेशला विजेचा शॉक लागला. या धक्क्याने त्यांचा खांबावरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी विद्युतपुरवठा बंद केला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व महावितरण कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Share This Article
Exit mobile version