-प्रगतशील शेतकरी म्हणून परिसरात ओळख; धानोरा महासिद्ध येथे अंत्यसंस्कार
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : येथील श्री शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन कुले यांचे वडील पांडुरंग निनाजी कुले यांचे दि. १ मार्च रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पांडुरंग कुले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांचे मूळगाव धानोरा महासिद्ध (ता. जळगाव जामोद) येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. शेतीसोबत जोडधंदे करत त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले. गावातील विविध सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबियांसह गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

