-विदर्भ तलाठी संघ नागपूर-2, सिंदखेडराजा उपविभागाची वार्षिक आमसभा संपन्न; -शिवानंद सानप अध्यक्ष, वसुदेव जायभाये सचिव, संजय हांडे उपाध्यक्ष बिनविरोध
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – विदर्भ तलाठी संघ नागपूर-2 उपविभाग शाखा सिंदखेडराजा यांची वार्षिक आमसभा जिजाऊ सृष्टी येथे उत्साहात पार पडली. संघटन बळकटी, संवर्गाच्या प्रलंबित मागण्या आणि प्रशासकीय प्रश्नांवर एकजुटीने भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभाग अध्यक्ष पंढरीनाथ जायभाये होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विजेंद्रजी धोंडगे, जिल्हा सचिव शिवानंदजी वाकदकर, माजी सचिव राजे भागवत जाधव तसेच माजी अध्यक्ष गजानन सांगळे उपस्थित होते. आजी-माजी पदाधिकारी आणि तलाठी बांधवांची मोठी उपस्थिती सभेला लाभली. सन २०२६-२७ साठी उपविभाग कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी शिवानंद सानप, उपाध्यक्षपदी संजय हांडे तर सचिवपदी वसुदेव जायभाये यांची निवड जाहीर करण्यात आली.
याशिवाय सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणीत आनंदसिंग राजपूत (अध्यक्ष), अंजना गिरणारे (उपाध्यक्ष) व विलास कटारे (सचिव) यांची निवड झाली. देऊळगाव राजा तालुका कार्यकारिणीत संजय बरांडे (अध्यक्ष), तेजस शेटे (उपाध्यक्ष) व सुमित जाधव (सचिव) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. मान्यवरांनी मार्गदर्शन करताना तलाठी संवर्गाच्या न्याय्य मागण्या शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी संघटनात्मक एकात्मता आवश्यक असल्याचे सांगितले. सेवाशर्ती, प्रशासकीय कामकाजातील अडचणी आणि अधिकार प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. सभेचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.

