-छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; स्वास्थ्य व पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश
बुलढाणा (जिल्हाप्रतिनिधी) : शौर्य, स्वाभिमान आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा सायकलिंग क्लबतर्फे विशेष ३० किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या प्रेरणादायी रॅलीद्वारे स्वास्थ्य, शिस्त आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
क्लबचे अध्यक्ष श्री. दीपक क्यावल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली सकाळी ६.३० वाजता जयस्तंभ चौक येथून प्रारंभ झाली. रॅली हतेडी येथे पोहोचली असता तेथील शिवस्मारकास सदस्य बाळूभाऊ काटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रॅली बुलढाणा येथे परत येऊन संगम चौकातील शिवस्मारकास अभिवादन करून सांगता करण्यात आली.
यावेळी मा. आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित राहून रॅलीतील सदस्यांना शुभेच्छा दिल्या. शिवगर्जना देत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. रॅलीचे प्रमुख नितीन देशमुख व कैलास जयस्वाल यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली. या रॅलीमध्ये नितीन देशमुख, कैलास जयस्वाल, संजय मयुरे, संदीप राजपूत, सुरज पवार, विष्णु गाढे, हर्ष गाढे, अनुप पाटील, नरेंद्र चोपडे, रंजित व्यवहारे, मंगेश वसे, डॉ. संदीप काळे, विनोद लांडे पाटील, संदीप मुंढे, अपूर्व भालेराव, राहुल मोरे, ओम जाधव, चंद्रकांत जाधव, विठ्ठलराव चव्हाण, डॉ. मंगेश पाटील, विजय जायभाये, अनु माकोने, पंकज सपकाळ, प्रथमेश काकडे, प्रतीक देशमुख व अनिल सावळे आदी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

