लुंबिनी नगर, चिखली येथील अंगणवाडी केंद्रात शिवजयंती उत्साहात साजरी

breakingmah Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-विद्यार्थ्यांची ऐतिहासिक वेशभूषा; पराक्रमाच्या गोष्टींनी बालचिमुकले प्रेरित

देऊळगाव घुबे (महेंद्र हिवाळे) : लुंबिनी नगर, जाफराबाद रोड, चिखली येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक १८५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शिवजयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाबाई तसेच विविध संतांच्या वेशभूषा परिधान करून ऐतिहासिक वातावरण निर्माण केले. लहानग्यांच्या या आकर्षक सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अंगणवाडी सेविका सौ. जयश्री चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत त्यांच्या कार्याची माहिती बालविद्यार्थ्यांना दिली. त्यांच्या प्रेरणादायी कथनामुळे मुलांमध्ये देशप्रेम व शौर्याची भावना जागृत झाली.

कार्यक्रमास मदतनीस अश्विनी शितोळे, पत्रकार विनोद चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पवार, ददरे ताई, रोहिणी सपकाळ, डांगेताई, जायले ताई, राजश्री गवई, कल्पना चव्हाण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका जयश्री चव्हाण व मदतनीस अश्विनी शितोळे यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साह, प्रेरणा आणि संस्कारांचा संगम असलेली ही शिवजयंती लुंबिनी नगर परिसरात संस्मरणीय ठरली.

Share This Article
Exit mobile version