छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साखरखेर्ड्यात मोठ्या उत्साहात साजरी

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-ढोल-ताशांच्या गजरात अभिवादन; मेहकर टी-पॉईंटवर पुतळ्याचे पूजन

साखरखेर्डा  (अशोक इंगळे) : समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त साखरखेर्डा येथे शिवरायांच्या जयघोषात व ढोल-ताशांच्या निनादात उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. नगरीतील तसेच परिसरातील युवक, लहान-थोर, महिला-पुरुष मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.

मेहकर टी-पॉईंट चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत स्थापना करण्यात आली होती. सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिकांनी पुतळ्याचे पूजन करून मनोभावे वंदन केले. बाळगोपाळांनीही जयंती सोहळ्यात उत्साहाने सहभाग नोंदविला. “जय भवानी, जय शिवराय” च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थित शिवभक्तांचा भगवी शिवटोपी व भगवा रूमाल देऊन सन्मान करण्यात आला. काही शालेय विद्यार्थी व नागरिकांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर पऱ्हाड यांनी स्वराज्य स्थापनेचा आदर्श आणि सर्वधर्मसमभाव जपत केलेला राज्यकारभार यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

सकाळी सुमारे १० वाजता सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. गावातील विविध पक्षांचे पदाधिकारी व विविध जाती-धर्मातील नागरिकांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, शिवसेनेचे श्रीनिवास खेडेकर, सरपंच सौ. ज्योती सचिन जाधव, कार्याध्यक्ष सुनील बबनराव रिंढे, कोषाध्यक्ष अरुण देशमुख, माजी सरपंच कमलाकर गवई, भाजपचे प्रदेश प्रतिनिधी तथा प्रल्हाद महाराज संस्थानचे उपाध्यक्ष रावसाहेब देशपांडे, माजी सभापती राजू ठोके, महेंद्र पाटील, अर्जुन गवई, अंकूर देशपांडे, सिताराम काळे, पूनमताई महेंद्र पाटील, स्नेहल पाटील, ठाणेदार गजानन करेवाड, सीताराम तायडे, संदीप मगर, अशोकराव पाटील, सुनील जगताप, दिलीप बेंडमाळी, ललित अग्रवाल, डॉ. ज्ञानेश्वर तांगडे, राजू काटे, ईश्वर पऱ्हाड, सोनू पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि पऱ्हाड, पवन जाधव, विलास रिंढे, कुणाल सुस्ते, बबलू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच श्री शिवाजी व्यायाम शाळा परिसरातही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित महिलांनी महाआरती करून पूजन केले असून वार्ड क्रमांक ५ मधील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.

Share This Article
Exit mobile version