देऊळगाव येथे शिवजन्मोत्सवानिमित्त मोफत भव्य महाआरोग्य शिबिर

admin Add a Comment 1 Min Read
1 Min Read

-१९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजन

देऊळगाव (राजेंद्र घुबे) : येथे शिवप्रतिष्ठान व देऊळगावचा राजा विघ्नहर्ता गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव २०२६ निमित्त मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक, देऊळगाव येथे हे शिबिर पार पडणार आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये बीपी, शुगर व हृदयरोग तपासणी, फुफ्फुस रोग तपासणी, दंतरोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, सांधेदुखी तपासणी, बालरोग तपासणी तसेच त्वचारोग तपासणी अशा विविध तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. तसेच पोटाचे विकार, छातीत दुखणे, दमा, मधुमेह, कंबरदुखी, मूळव्याध, थायरॉईड, गर्भधारणा मार्गदर्शन आणि इतर सामान्य तसेच दीर्घकालीन आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे.

या शिबिरासाठी विविध क्षेत्रातील अनुभवी व नामांकित डॉक्टरांची उपस्थिती राहणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version